अलीकडे वाचन संस्कृती कमी कमी होत चालल्याचे दिसते. त्यामुळे मोठमोठाले धर्मग्रंथ, कथा-कादंबऱ्या, लेख वाचण्याकडे फारसा कुणाचा कल असत नाही. आवड असली तरी वाचायला पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती.
ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांची रोजनिशी सुमारे १२ वर्षांपूर्वी मला भेट म्हणून मिळाली, आणि त्यातली मला ‘एका पानावर एक संदेश’ ही संकल्पना खूपच आवडली. कोणतेही पान उघडावे आणि त्यादिवशी आवश्यक असलेलंच काहीतरी मार्गदर्शन मिळावं असे खूपदा अनुभवही आले.
त्यावरून प्रेरणा घेऊन मी १२ वर्षांपूर्वी मी *स्वगत* या शीर्षकाची ३६५ लघुलेखांची माला लिहिण्याचा संकल्प केला. रोज एक लघुलेख लिहायचा आणि सर्वांना पाठवायचा. लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्यामुळे आजवर हे ३६५ लघुलेख किमान दहा वेळा तरी सर्क्यूलेट झाले असतील.
या सर्व ३६५ लघुलेखांचा एकत्रित आविष्कार म्हणजे हे पुस्तक *प्रेरणा ३६५*
फक्त २० सेकंदात एक लघु लेख वाचून होईल. एका लेखाची दुसऱ्या लेखाशी काही सलगता जाणीवपूर्वक न ठेवल्याने कोणतेही पान उघडावे आणि वाचावे. त्यातून तुम्हाला काही ना काही मौल्यवान संदेश, दिशा, प्रेरणा मिळेलच ही मला खात्री आहे.
या सर्व लेखांचे ऑडिओज पण यूट्यूब वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्याचाही लाभ घ्यायला हरकत नाही.
या लघुलेख निर्मितीचं मूळ प्रेरणास्थान ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पाठोपाठ माझे सर्व गुरुतुल्य शिक्षक, कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्राहक, चाहते, हितचिंतक या सर्वांचा मी मन:पूर्वक ऋणी आहे.
चंद्रकांत पागे
चीफ कौन्सेलर,
मिशन ऑनलाईन कौन्सेलिंग
9967311224